Friday, May 15, 2020

ऑनलाईन विक्रीतून व्यवसाय वाढवा – Article 2

हेन्री फोर्डने पहिली मोटार रस्त्यावर चालवली तेव्हा काही जुन्या विचाराना चिकटून राहणारे लोक म्हणाले, हे तात्पुरते ‘फॅड’ आहे जे जाणार  आहे आणि घोडागाड्याच कायम, पुढेही राहणार  आहेत. आज जगाला किती वाहनांचा उपयोग झाला हे आपल्याला दिसते. याचा अर्थ नक्की की ज्या नव्या गोष्टीत जगाला उपयोग दिसतो ती गोष्ट लोक उचलून  धरतात, अधिकाधिक वापरतात.
थोडक्यात बदलत्या काळाबरोबर आपणही दृष्टिकोन बदलायला हवा !
तुम्हीच विचार करा… आमच्यावेळी असे नव्हते… आमच्यावेळी हे, ते  नव्हते, असे आपण किती दिवस बोलणार. साधे उदाहरण  घ्या. चुलीच्याजागी किचन गॅस आला, आता इंडक्शनवर स्वयंपाक होतो. कारण काळ बदलत जातो, नवनवे प्रोडक्ट्स येतात. जीवनशैली बदलते. तरीही काही व्यक्ती आपला दृष्टिकोन का बदलत नाहीत! या मानसिकतेचे एक कारण आहे. त्यांना जे चालले ते ठीक चालले आहे, मग का ते बदलायचे असे वाटते. नव्या गोष्टी स्वीकारण्यात त्यांना रिस्क वाटते. त्यांना नीट माहिती नसते, ती किती सोपी आहे, प्रगत आहे, त्यात कसा जास्त फायदा आहे ते तो माहीत करून घेत नाहीत. जे हे समजावून घेतात तेच पुढे जातात, जीवन, व्यवसाय समृद्ध करतात.
आज नव्या जगात सगळ्यात मोठा बदल आणला आहे मोबाईल फोन्स, कॉम्पुटर व Internet & websites ने आपली एकदुसऱ्याला  संपर्क करण्याची पद्धत बदलली आहे, वेगवान झाली आहे.  वस्तूंच्या खरेदी-विक्री करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे.  लोक  आता जगभर online shopping करत आहेत. घरी लागणाऱ्या गहू तांदळापासून कॉस्मेटिक्स, कपडे, शूज व मोबाईल फोनपर्यंत आपण वेबसाईट पाहून वस्तू विकत घेत आहोत. या पद्धतीला आपण म्हणतो Online shopping, ती  आपण करतो E-Commerce website वर !
ऑनलाईन शॉपिंग-आता खरेदी लगेच आणि सहजपणे !
आठवा, परवाच तुम्ही बेडशीट्स खरेदी करण्यासाठी काय केलेत! मार्केटमध्ये गेलात , वेगवेगळी बेडशीट्स पहिलीत,  अनेक दुकाने फिरलात, व शेवटी पसंत पडलेले बेडशीट घरी आणलेत. यात वेळ, एनर्जी व पैसे खर्च झाले. हेच बेडशीट तुम्ही Online shopping website वर घरबसल्या मोबाईलवर, एखाद्या वेबसाईटवर सर्च केले असते व एका क्लिकने ते  घरपोच मिळवले असते. ऑनलाईन खरेदी आज इतकी सोपी व बचतही करणारी आहे.
तुम्हीही ऑनलाईन विक्रीतून व्यवसाय अनेक पटीने वाढवू शकता- थोड्या बजेटमध्ये!
व्यवसाय वाढवण्यासाठी आपण शोरूम ,शाखा वाढवतो. पण याबरोबर आता तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सची विक्री ऑनलाईन करू शकता. यासाठी मार्ग आहे आपल्या कंपनीची E Commerce Website तयार करणे! Web Design Agency in Pune ही ईकॉमर्स वेबसाईट तुम्हाला तयार करून देऊ शकते  या वेबसाईटवर तुम्ही आपल्या प्रोडक्ट्चा व त्यांची किंमत  सांगणारा E catalogue दाखवू शकता.
Ecommerce website:  पुरेपूर फायदे!
हा मार्ग तुम्हाला वाटतो तसा खर्चिक व अवघड नाही. तो वापरण्यास सोपा आहे.
  • शोरूम,दुकानाचा कामाचा व्याप व खर्च नाही.
  • वाजवी खर्चात ही वेबसाईट होऊ शकते व वेळोवेळी नवे प्रोडक्ट्स त्यावर दाखवता येतात. कमीतकमी संख्येची expert टीम हे काम करू शकते .
  • शोरूमसारखी यास सुट्टी नाही- येथे हा व्यवसाय तुम्ही २४ तास करू शकता.
  • ग्राहकांबरोबर प्रोडक्ट्च्या किमतीची घासाघीस नाही. पेमेन्टचे अकौंटही उत्तम ठेवता येते . यासाठी वेबसाईटला तुमच्या बँकेचे खाते जोडता येते व ग्राहक प्रोडक्ट् ऑर्डर करताना कार्डने पेमेंट भरतो व ते थेट तुमच्या खात्यात जमा होते . यालाच Payment gateway म्हणतात.
  • सर्वात महत्वाचे, तुमची वेबसाईट साऱ्या जगात प्रसारित होते व जगभर तुमचे प्रोडक्ट् विकले जाऊ शकते व व्यवसाय जगभर वाढतो.
  • ह्या वेबसाईटचा तुम्हाला जगातील हव्या त्या भागात प्रसार वेबसाईट एजन्सी तुम्हाला करून देते. त्यामळे तुमचा व्यवसाय तुमच्या Business & marketing Target प्रमाणे वाढवता येतो.
Bright Pixel ही Website Design & Development Company in Pune आहे. या एजन्सीने ऑनलाईन कॉस्मेटिक ब्रँड [ SSCPL Herbals ], पेंटिंग्ज [Saiartonline] , ऑनलाईन पैठणी [ Swapnagandha collection ], औषधे [ Green pharmacy ] कंपन्यांच्या ईकॉमर्स वेबसाईट Ecommerce website केल्या आहेत. दर महिन्याला ही एजन्सी या वेबसाईटवर नवनवे प्रोडक्ट्स या कंपन्यांनी दिलेल्या  माहितीनुसार प्रसारित करते व वेबसाईट्चा  प्रसार करते. यातून या Online sale of products दिवसागणिक वाढतो.
या कंपन्यांच्या वेबसाईट तुम्ही अवश्य पहा व त्यानंतर Bright Pixel website नक्कीच पहा . यात तुम्हाला Ecommerse website वेगवेगळ्या प्रोडक्ट्स साठी कसे  केले आहे हे पाहावयास मिळेल. यावर तुम्हाला Graphic design, Space branding , Brochure design, Website design, Digital marketing कामाची उपयुक्त माहिती मिळेल